सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते स्व. नारायणरावजी पाटिल वानखेडे यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्ताने डॉ. विजयराव माने साहेब*चेअरमन, कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या मार्गदर्शनात श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय, ब्राह्मणगाव तर्फे देणगी म्हणून देण्यात आलेले 1200 मिश्र वृक्षांचे रोपण भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक( ज्या बँकेत लोकांनी देणगी स्वरूपात दिलेले वृक्ष लागवड करणे आणि त्या वृक्ष्यामुळे वातावरणातील किती कार्बन डाइऑक्साईड (CO2) चे विघटन करून किती कर्ब (C) खोडा मध्ये साठउन उरलेले किती प्राण वायू (O2) वातावरणात विसर्जित केले या कार्बन क्रेडिट चे जमा पासबुक मध्ये हिशोब नोंद करून देणगी देणाऱ्यांच्या खात्या चा कार्बन फिक्स डीपोझीट चा हिशोभ ठेवणारी बँक) या बँकेच्या सहकार्याने महादेव मंदिर परजना, व भुजाप्पा देवस्थान, ब्राह्मणगाव या टेकडी परिसरावर मिश्र स्वरूपाची (वड, पिंपळ , करंज, सीताफळ ) असे 1200 वृक्ष रोप लावण्यात येणार आहेत, या वृक्ष लागवडीचे वृक्ष रोपण कार्यक्रम आज रोजी डॉ. विजयराव माने यांच्या शुभ हस्ते आणि खरूस, परजणा, ब्राह्मणगाव व चातारी या गावातील मान्यवरांनी झाडांची लागवड करून गावातील आठ शेळी चारणाऱ्या शेळराखी लोकांचे शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करून या वृक्ष लागवड केलेल्या परिसराची सुरक्षा करण्यासाठी व या ठिकाणी शेळ्या न चारण्याचा संकल्प त्यांच्याकडून घेऊन गांधी गिरी चा प्रयत्न करण्यात आला. दिनांक 6/8/2023 रोजी महादेव मंदीर परजना येथे व तदनंतर भुजप्पा महादेव मंदिर ब्राम्हणगाव येथे ह्या भव्य वृक्ष लागवड कार्यक्रची सुरुवात केली, यावेळी खरूस येथील नारायणराव पाटील वानखेडे यांचे नातू ऋतिक सुशीलकुमार वानखेडे, अभिषेक वानखेडे, दत्तराव वानखेडे तसेच परजना येथील सरपंच सौ स्वाती वाघमारे ,उपसरपंच संजय सावंत, पोलीस पाटील सौ बबिता दवणे , त.मु. अध्यक्ष संजय वाघमारे , वि.का.स. सो.अध्यक्ष पंडितराव सावंत , महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष निळकंठ वाघमारे, सचिव विश्वास वाघमारे, उपाध्यक्ष सुभाषराव सावंत, गजानन वाघमारे व ईतर सर्व सदस्य आणि परजना येथील गावकरी मंडळी व ब्राह्मणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे, रत्नाकर अण्णा मुक्कावार, गजानन कोंडरवाड, बनसोड मॅडम, मारुती काचेबोईनवाड, परमेश्वर कोंडरवाड विष्णू राजेवाड आणि चातारी येथिल सरपंच रंजनाताई माने दादाराव पाटील माने, दत्तराव माने कल्याणराव लालजी माने,शामराव माने,डॉ विठ्ठलराव गोविंदवार, चंद्रकांत पवार,
किसनराव खांडरे, कैलासराव माने, आनंदराव माने,गजाननराव माने,शिवाजी नरवाडे, दत्ता गणेशराव माने, संतोष माने, तसेच तेजमल गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक पेंटेवाड, अशोक शिरफुले, आकाश गरुडे, जनार्धन नलेवाड या सर्वांनी वृक्ष लागवड करून सहभाग नोंदविला. उद्या पासून तेजमल गांधी कृषी विद्यालय व भाऊसाहेब माने कृषी तंत्र विद्यालय चे विद्यार्थीन मार्फत वृक्ष लागवडीस सुरुवात होणार, यासाठी परजना येथील महादेव मंदिर संस्थान चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, आणि सर्व सदस्य यांनी सहकार्य व सहभाग लाभणार आहे