सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम ब्राह्मणगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अन्न व तंत्र महाविद्यालय यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने होते तसेच प्रमुख पाहूने म्हणून ब्राह्मणगावचे प्रथम नागरिक परमात्माजी गरुडे,रत्नाकर अण्णा मुक्कावार,तानाजीराव शिरगिरे, नागनाथ ढोले, प्रकाश धबडगे, प्राचार्य प्रकाशराव पेंटेवाड,सुधाकरराव वानखेडे, किसनराव काळे, किरणताई जोशी,नयनभाऊ पुद्दलवाड, कैलासराव कोंडरवाड, अविनाश विणकरे व मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती.यावेळी अध्यक्षीय भासणातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना डॉ. विजयराव माने यांनी महामानवांच्या प्रतिमा डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेऊन स्वतःची व समाजाची प्रगती कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.











