अनंत कराड
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
अँड. प्रताप ढाकणे सात ते आठ गावांना दररोज भेटी लोक भावना घेणार समजून. देशातील व राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य लोकांमध्ये अस्वस्थता दिसते या परिस्थितीमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. लोकांच्या भावना समजावून घेतल्यानंतर लोकांच्या भावनांचा स्फोट होऊ शकतो. या नकारात्मक वातावरणात लोकांच्या संवेदना व भावना समजून घेण्यासाठी लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी या उद्देशाने गाव चलो घर चलो अभियानाच्या आयोजन केले असल्याचे माहिती अँड प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ढाकणे म्हणाले आम्ही आयोजित करत असलेल्या अभियान राजकीय किंवा मतासाठी नाही. सामाजिक क्षेत्रात काम करताना लोकांच्या जनभावना समजून नाही घेतल्या तर अधिकचे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे सर्वसामान्य लोकांशी थेटपणे हितगुज करण्यासाठी आम्ही दररोज मतदार संघातील सात ते आठ गावांना भेटी देणार आहोत देशात व राज्यातील परिस्थितीबाबत लोकांना काय हवे आहे त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत समाजाला काय वाटते त्यांची मानसिकता काय आहे याचा अहवाल शरद पवार यांना सादर करणार असल्याचे ढाकणे म्हणाले. शासनाच्या येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे गोरगरिबांच्या मुलांचे खूप मोठे नुकसान होणार आहे शेतीमालाचा बाजार भाव गॅस पेट्रोल डिझेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती गेल्या नऊ वर्षापासून मोदी सरकारने 70 हजार बेरोजगारांचा नोकरी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचे काय झाले मोदी सरकारच्या काळात सरकारी मालकीच्या नफ्यातील कंपन्या भांडवलदारांना विकण्याचा उद्देश काय. काळा पैसा परत आणण्याचे सर्वसामान्यांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकण्याची घोषणा असे अनेक प्रश्न समजून घेण्यासाठी गाव चलो घर चलो अभियानांतर्गत लोकांशी करणार असल्याचे ढाकणे म्हणाले. यावेळी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे नगरसेवक बंडू बोरुडे सविता भापकर सिताराम बोरुडे दिगंबर गाडे देवा पवार उपस्थित होते.











