जितेंद्र लखोटिया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
हिवरखेड : आजच्या या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांची स्वतः शिकण्याची जिज्ञासा कमी झाली असून स्वविकासासाठी पालकां नी मुलांना स्वतः शिकू द्यावे असे प्रतिपादन शिक्षक महेंद्र कराळे यांनी केले.स्थानिक ओम शांती मुख्य शाखेत आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमात पुढे बोलतांना ते म्हणाले की, कॉन्व्हेंट मध्ये विध्यार्थ्यांना खुप गृहपाठ दिला जातो आणि तो गृहपाठ विद्यार्थी पालकांच्या सहाय्याने किंवा मोबाईलवर सर्च करून पूर्ण करतात यामुळे त्यांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळवणे सहज शक्य झाल्याने त्यांच्यातील जिज्ञासुवृत्ती कमी होत असून ,कॅलकुलेटर मुळे गणितीय क्रिया सहज होत असल्याने त्यांचा बुद्यांक प्रभावित होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापक दिलीप भगत सर होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ओम शांती सारख्या एखाद्या सामाजिक संस्थेकडून शिक्षकांचा होणारा सत्कार हा माझ्या पूर्ण सेवाकाळातील हा दुसराच प्रसंग असल्याचे उद्गार त्यांनी काढले.संचालिका रश्मीदीदी यांनी मी भगत सरांचीच विद्यार्थिनी असून मला त्यांचा सत्कार करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजते असे गौरवोद्गार काढले. यावेळी प्रा.संतोषकुमार राऊत,सेवानिवृत्त शिक्षक बनकर सर,कवळकार सर,गणेश अग्रवाल इत्यादींची उपस्थिती होती.यावेळी ओम शांती मुख्य शाखेच्या वतीने ब्रम्हकुमार देविदास इखार यांनी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. सोबतच माउंटअबू येथे शांतीवनात शिबिरासाठी गेलेले हिवरखेड येथील पत्रकार बाळासाहेब नेरकर,अनिल कवळकार,राजेश अस्वार, राजेश पांडव,कैलास डांगे,सागर दाते यांचा सुद्धा रश्मीदीदीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्वांनी आपले तेथील अनुभव कथन केले व प्रत्येकाने एकदा तरी भूतलावरील या स्वर्गीय स्थळाला भेट द्यावी असे आवाहन केले.
यावेळी बिट जमादार नेव्हरे,हभप अनंता महाराज रेखाते, अनिल राऊत,देविदास फोपसे,संतोष शर्मा, मधुकर मोरोकार ,श्रीमती इलरकार,सौ.बोडखेताई,श्रीमती डांगेताई,सौ.नेव्हरे ताई,गजानन येउल, सौ. रेखातेताई,सौ.येउल ताई, रमेश येऊल, श्रीमती अग्रवाल,सौ.कराळेताई इत्यादी उपस्थित होते. पांडव भवन ते शांतिभवन याचे वर्णन करीत बाळासाहेब नेरकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचालन केले तर मोहनभाई मानसेता यांनी आभार प्रदर्शन केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)