चंचल पितांबरवले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील निष्पक्ष पत्रकारिता करणारे गोरगरीब जनतेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे देशोन्नतीचे प्रतिनिधी, दैनिक अधिकार नामाचे तालुका प्रतिनिधी, एम सी एन न्यूज चैनल चे तालुका रिपोर्टर पातुर नंदापूरचं विकास ठाकरे यांना एमसीएन न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एमसीएन न्युजच्या कॅमेरातुन टीपत शोध घेऊन अशा निवडक रत्नांचा गौवरव व्हावा याच संकल्पनेतून MCN NEWS चे संपादक राजिव वाढे यांनी 12 वर्षापासुन हे दिव्य कार्य तेवत ठेवणारे विकास ठाकरे यांच्या अनमोल अशा कार्याची दखल घेऊन एमसीएन न्युजच्या नवव्या वर्धापनदिनामित्त आयोजित कार्यक्रमात सहकार विद्यामंदीर बु-हानपुर रोड जळगाव जा.येथे एम.सी.एन.मराठी न्युज चा नवव्या वर्धापनदिनामित्त भव्यदीव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विकास ठाकरे यांना यंदाचा उत्कृष्ट पत्रकारिता प्रदान करण्यात आला.
मंचावर उपस्थित मान्यवर मा.कॅबिनेट मंत्री डाॅ.संजयजी कुटे, मा.प्रतापराव जाधव, खासदार बुलढाणा, मा.पी.डी.पाटील, जिल्हा दूरसंचार अधिकारी बुलढाणा,मा.प्रा. धनंजयजी गोगटे अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा,मा.वैशाली देवकर मॅडम उपविभागीय अधिकारी जळगाव जा., मा.शितल सोलाट मॅडम तहसीलदार जळगाव जा.,मा.सुनिलजी अंबुलकर पोलीस निरीक्षक जळगाव जा. आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने पत्रकार विकास ठाकरे यांना सन्मानचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव आणी एमसीएन टीम चे सर्व पदाधिकारी तसेच अकोला जिल्ह्यातील सत्कार मुर्ती पत्रकार बांधव उपस्थित होते.अशी माहिती एमसीएन न्युज चॅनलचे संपादक राजीव वाढे जळगाव जा.यांनी दीली आहे.











