कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : धम्म नायक सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे व सभोवतालच्या अतिक्रमण हटवून सौंदर्यीकरण करण्यासाठी साखळी उपोषण काल दी. 5 सप्टेंबर 2022 पासून सुरू करण्यात आले आहे .
सदर उपोषण सुरू करत असल्याचे निवेदन नगर परिषद मुख्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी पुसद, तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा, व आ. इंद्रनील नाईक आमदार निलय नाईक यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.अशी माहिती प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष, विठ्ठल खडसे सर उपस्थित पदाधिकारी यांनी दिली आहे. सविस्तर माहिती अशी की प्रज्ञापर्व् समिती 2022 च्या वतीने पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण व सुशोभीकरण संदर्भात नगर परिषद पुसद मुख्याधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष, यांच्याशी अनेक वेळा प्रज्ञा पूर्व शिष्टमंडळाने बैठका, निवेदन, चर्चा घेण्यात आल्या परंतु नगर परिषदेच्या कार्यालयातून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही म्हणून प्रज्ञा पर्व समिती व समाज बांधव यांच्या वतीने नाईलाजास्तव पुतळा सौंदर्यीकरण व सुशोभीकरण संदर्भात लोकशाही मार्गाने उपोषणाचा अवलंब करावा लागत आहे.
प्रशासनाने कुंभकर्णाची भूमिका घेतल्यास हे उपोषण अधिक तीव्र करून साखळी उपोषण धरणे आंदोलन,याही मार्गाचा अवलंब केल्या जाईल अशी। महिति समितीच्या वतीने समितीच्या देण्यात आली.दिनांक 5 सप्टेंबर2022 पासून सुरू झालेल्या या साखळी उपोषणास वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने व भीम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ जिल्ह्याच्या च्या वतीने जाहीर लेखी पाठिंबा देण्यात आला आहे.या उपोषणाला ज्येष्ठ नागरिक संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये प्रामुख्याने एसएम भगत डॉ. खंडाईत बीएफ कांबळे, विजय कांबळे, रमेश सावळे ,डॉ राजेंद्र डोंगरे,ल.पू.कांबळे इत्यादीने हिरारीने भाग घेऊन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे हे विशेष”सदर उपोषण हे क्रमिक पद्धतीने चालू राहणार असून यापुढील काळात होणाऱ्या दुष्परिणामस् प्रशासन जबाबदार राहील असे प्रज्ञापर्व समिती व उपस्थित समाज बांधव यांच्या वतीने सांगण्यात आले.
या उपोषणाला प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष, विठ्ठल खडसे सर आंबेडकरी ज्येष्ठ नेते भीमराव दादा कांबळे प्रज्ञापर्व् समितीचे कार्याध्यक्ष अशोक भालेराव उपाध्यक्ष राजेश ढोले, राजेंद्र नाईक, प्रज्ञाप्प्र्व समितीचे माजी अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, दीपक भवरे,नरेंद्र पाटील, शुद्धोधन कांबळे,संघटक संतोष आंबोरे , सामाजिक कार्यकर्ता आकाश सावळे ,प्रमोद धुळे प्रसाद खंदारे , पत्रकार कैलास श्रावणे,सामाजिक कार्यकर्ता, मुन्ना हाटे, यादव हाटे इत्यादी इत्यादी प्रज्ञा पर्व समिती पदाधिकारी व समाज इत्यादी प्रज्ञापर्व समिती पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.