दिनेश शर्मा
शहर प्रतिनिधी बुलढाणा
बुलडाणा : पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी रा.से.यो. अंतर्गत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ.पी.एम.जावंधिया यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी जागृती चव्हाण यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्राबद्दल थोडक्यात माहिती दिली.यावेळी सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते . व ह्यांनी देखील डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमाचे डॉ.दिपक लद्धड , सचिव डॉ.संगीता लद्धड, सहसचिव रविंद्रजी लद्धड व कोषाध्यक्षा सौ.अर्चना लद्धड यांनी कौतुक केले.अभिवादन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृती चव्हाण, संजय खडसे, धनंजय श्रीनाथ, प्रियांका राजपूत, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.