दिनेश शर्मा
शहर प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : आई कॅरिअर अकॅडमी बुलढाणा बार्टी बुलढाणा सलग्नता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण बॅचमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचीत्त्य साधुन विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी बॅच मधील काही विध्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पडली. यामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व शिक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यासाठी आई कॅरिअर अकॅडमीतील मगर सर, उबरहंडे मॅडम, आतिक सर, तुषार सर, शेख सर या सर्व संबंधित विषयाच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच पोलीस भरती साठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या मैदानी तासिका घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांची चपळता आणि गुणवत्ता पूरक काही स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला शारीरिक कसब व कौशल्य दाखवले. दिवसाच्या शेवटी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त्य कार्यक्रमात योगदान दिले त्यांना कौतुकाची थाप म्हणून आई कॅरिअर अकॅडमीच्या संचालिका सौ.सुनीता शिवाजी गवई, तसेच संस्थापक शिवाजी गवई, सोबत सहशिक्षक यांच्या हस्ते आकाश सुलतान, योगेश मोरे, वैशाली जाधव, कामिनी इंगळे, प्रियंका वानखडे, निशा शेगोकार, प्रतीक्षा मोरे, निकिता मोरे, पूनम खंडेराव, करिष्मा इंगळे, प्रफुल दामोदर, संजना खराटे, आरती हिवराळे, अमितकुमार गायकवाड, अक्षय जावळे, दीक्षा उमाळे, यांचा प्रोत्साहनपर पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.