संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार : जिल्ह्यातील वडफळ्या -रोषमाळ बु ! नगरपंचायत धडगाव मधील विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी. या संदर्भात धडगाव तालुक्यातील भा.ज. पा.कार्यकर्ता कडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,वार्ड क्र.16 मधील रावजी लासमा वळवी यांच्या घराजवळ हातपंप काढले नाही. वार्ड क्र.17 मधील जुने धडगाव ते देवसिंग यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम झाले नाही धडगाव -वडफळ्या -रोषमाळ बु!नगरपंचायत मधील स्मशानभूमी ते इंद्रसिंग यांच्या घरापर्यंत रस्त्याची 690 मी. लांबीच्या गोटारीचे काम झालेच नाही. वार्ड क्र. 16 मधील रावजी लासमा वळवी यांच्या घराजवळ सन 2018-19 साली हातपंप मंजूर असून अद्यापही काढण्यात आलेला नाही. तसेच वार्ड क्र. 17 मधील जुने धडगाव रोड ते देवसिंग पराडके यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर होता तो सुद्धा अद्यापही तयार करण्यात आलेला नाही. सदर रस्ता हा नगरोस्थान आदिवासी उपयोजना या योजनेमार्फत वर्ष 2017-18 साली मंजूर झाले तो अजूनपर्यंत तयार करण्यात आलेला नाही. वार्ड क्र.17 मधील स्मशानभूमी ते इंद्रसिंग यांच्या घरापर्यंत रस्त्याची 690 मी. लांबीच्या गोटारीचे कामे झाले नाही व कागदोपत्री हे सर्व कामे पूर्ण झाले असे दाखविले आहे. तसेच सदर कामाची तक्रार ही नगरपंचायत मुख्याधिकारी धडगाव रोषमाळ बु नगरपंचायत यांच्या कडे देखील केली होती. तरी देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. तरी महाशयांना विनंती करीत आहोत की वरील सर्व मुद्दे लक्षात देऊन या सर्व कामाची सखोल चौकशी ठेकेदारावर कडक कार्यवाही करण्यात यावी. सदर कामाची चौकशी 15 दिवसात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया सोमर आमरण उपोषण करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहिलं असे निवेदनात नमूद करण्यात आहे आहे.दामू केल्ला पराडके, जगन गणपत पराडके गावातील काही सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.











