मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘कोरोना नंतर सावरलेले जीवनमान’ हा स्पर्धेचा विषय आहे,स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिस १००१,द्वितीय बक्षिस ७०१ व तृतीय बक्षिस ५०१ असे राहणार आहेत,निबंध लिहून माऊली झेरॉक्स मोठा महादेव संस्थान जवळ हिवरखेड,विघ्नहर्ता आर्ट क्लासेस, माहेश्वरी वस्त्र भंडार समोर हिवरखेड, प्रा.गौतम इंगळे सर, ओम कॉम्प्युटर्स शैलेश कॉलनी हिवरखेड येथे जमा करू शकतील किंवा mansuvarnpratishthan@gmail.com या ईमेल वर सुद्धा पाठवू शकतील.स्पर्धेतील सहभागी होणाऱ्यांनी निबंध हा स्वतःच्या अक्षरात लिहिलेला असावा,शब्दमर्यादा १०००पेक्षा जास्त नसावी,स्पर्धकाने निबंध बंद लिफाफ्यात पाठवावा,स्पर्धकाने लिफाफ्यावर स्वतःचे संपुर्ण नाव,पत्ता, शाळेचे /महाविद्यालयाचे नाव व मोबाईल क्रमाक सुवाच्च अक्षरात लिहुन पाठवावे,निबंध पाठवण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२२ ही राहील.स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.