सतिश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली त्यामुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅग,ग्लास, थर्माकोल,फायबर प्लेट्स अशा वस्तूंच्या वापरावर मनाई आहे तर दुसरीकडे सध्या बाजारात चायनीज बनावटीचे विविध प्रकारचा सजावटीचे साहित्य पाहायला मिळते विशेषतः प्लास्टिकची फुलं, पान,रंगबिरंगी तोरण, हार यांचा समावेश आहे. प्लास्टिकच्या फुलांमुळे खऱ्या फुलांची विक्री करणाऱ्यांवर मोठा परिणाम झालाय.त्यामुळे चिनी बनावटीच्या प्लास्टिकच्या फुलांनाही बंदी घालावी अशी मागणी होते. पण सध्या तरी बाजारात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या रंगबिरंगी फुलांच्या माळा लक्ष वेधून घेत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. गणेश उत्सवासाठी व गवरी आगमन इत्यादी सनामध्ये मखर,देवघर,फुलांच्या माळा, रंगीबेरंगी दिवे, विद्युत रोषणाई यांचा वापर होतो. गणेशोत्सवात फुलं आणि फळांना मागणी वाढते मात्र सध्या जर बाजारपेठेत चक्कर टाकली तर ठीक ठिकाणी रंगीबेरंगी प्लास्टिकच्या फुलांच्या माळा लक्ष वेधून घेतात. शहरातील अनेक दुकानांमध्ये आणि अगदी फेरीवाल्यांकडेही चिनी बनावटीच्या प्लास्टिकच्या फुलांच्या माळा,तोरण, पुष्पगुच्छ, फ्लॉवर पॉट, मधील फुलं यांची व्हेरायटी पाहायला मिळते.ही फुलं किंवा माळा इतक्या खऱ्या वाटतात की जवळ जाऊन पाहिल्याशिवाय ती खरी फुलं नाहीत हे पटतच नाही. त्यामुळेच चायनीज बनावटीच्या प्लास्टिकच्या फुलांच्या माळा खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय.साहजिकच मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार चायनीज उत्पादनांचा ओघ वाढलाय. एकीकडे सिंगल न्यूज प्लास्टिकला बंदी आहे. चायनीज वस्तू वापरू नका असं वारंवार सांगितलं जात आहे.पण तरीही गणेशोत्सवमध्ये चायना मेड सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे.त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी व फुलाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक ही संकटात सापडले आहे. अशी खंत मेहकर तालुक्यातिल फुल व्यावसायिक व फुल शेतकरी यांनी व्यक्त केली आहे. पण देशाभिमान देशाचा आर्थिक हित स्थानिक फुले उत्पादक शेतकऱ्यांना आधार आणि फुलकारागिरांना प्रोत्साहन म्हणून प्लास्टिकच्या फुलांचा वापर टाळणं आवश्यक आहे.प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका होतो त्यामुळे वेळेस प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूंवर निर्बंध घालणं आवश्यक आहे. तर नागरिकांनी सुद्धा स्वतःहून प्लास्टिकचा वापर टाळण्याची गरज आहे. त्यातून सर्व सामान्य शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल व यांच्यासारखे अनेक हातावर व्यवसाय करणारी फुले उत्पादक शेतकरी, व्यावसायिक आणि माळी समाजाला ही दिलासा मिळेल.
चौकट….
बाजारात विविध प्लास्टिकचे फुले व चायनीज वस्तू दाखल झाल्यामुळे सर्व सामान्य फुल उत्पादन शेतकरी व व्यवसाय करणारे खूप मोठ्या अडचणी सापडले आहेत. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून शासनाने विशेष लक्ष द्यावे असे फुल उत्पादन शेतकरी व व्यापारी मागणी करत आहे.