अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील कॅडेट सुशील कांबळे ची निवड थलसेना कॅम्प दिल्लीकरिता झालेली आहे.इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला अंतर्गत तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील एनसीसी युनिटचा कॅडेट सुशील गणेश कांबळे वर्ग नववा याची निवड थलसेना कॅम्प दिल्लीकरिता झालेली आहे हा कॅम्प 14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2022 दिल्ली येथे होणार आहे आणि ह्या कॅम्प मध्ये सुशील गणेश कांबळे स्नॅप शूटिंग मध्ये निवड झालेली आहे. सुशील कांबळे हा कॅडेट्स चिचखेड बोडखा तालुका पातुर जिल्हा अकोला येथील आहे. अतिशय सर्वसामान्य परिवारातील आणि कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता स्वतःमध्ये असलेल्या गुणावरती याची निवड झालेली आहे. याकरिता इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे कर्नल बिजोय चौधरी लेफ्टनंट कर्नल सीपी भदोला यांचे विशेष मार्गदर्शन केले. सोबतच तुळसाबाई कावल विद्यालयाचे कॅडेट वरद वानखडे, पूर्वेस उपर्वट आणि शुभम परमाळे यांची निवड ऑक्टोबर 2022 ओडीसा येथे एक भारत श्रेष्ठ भारत या कॅम्प करिता निवड झालेली आहे. कॅडेट्स चे मनोबल उंचावण्याकरिता बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत ,सचिव स्नेहप्रभादेवी गहीलोत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.प्राचार्य अंशुमानसिंह गहीलोत, उपप्राचार्य एस.बी.चव्हाण,उपमुख्याध्यापक आर.एस. ढेगे, पर्यवेक्षक एम.बी परमाळे आणि एनसीसी युनिटचे एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे , एम एस चव्हाण यांनी कॅडेट्सच्या या कार्याचे कौतुक आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.