अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी, मालेगांव
मालेगांव : प्रा.गुलाब श्रीपत साबळे यांना शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक ,सामाजिक व पत्रकारिता या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनांक 9 जुलै 2023 रोजी विशाल सह्याद्री हॉल सदाशिव पेठ, पुणे येथे मोठ्या थाटात प्रा.गुलाब श्रीपत साबळे यांना राष्ट्र सेवा सन्मान2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार साई आनंद आणि स्वरकुल ट्रस्ट ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित माननीय आमदार विश्वनाथराव घागुर्डे, स्वामी विश्वाचार्य महाराज प्रसिद्ध योग गुरु ह.भ.प. जगन्नाथ मस्के प्रसिद्ध कीर्तनकार ,अरुणाथ गिरी महाराज जगन्नाथ मठाधिपती, आयोजक डॉ. विना खाडिलकर या मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या अगोदर त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श प्राध्यापक, आदर्श शिक्षक, भारतीय गुणवंत गौरव, राष्ट्रीय प्रतिभा गौरव, राष्ट्रीय शिक्षा गौरव, भारतीय मानव सेवा, जनसेवा लोक गौरव सन्मान, लोककला साधना गौरव , राष्ट्रीय कर्तव्य सन्मान ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अशा विविध 20 पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आले, यामध्ये आणखी एका राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार या मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे. या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते.तरी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.