वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट:- अरविंद विद्यालय, अडगाव खुर्द च्या विज्ञान शिक्षिका उज्वला किसन तायडे यांचे विज्ञानविषयक ‘कुतूहल’या पुस्तकाचे प्रकाशन प्रभात किड्स स्कूल अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.प्रभात किड्स अकोला येथे इंस्पायर अवॉर्ड विज्ञान कार्यशाळेत उपस्थित जिल्ह्यातील सर्वच विज्ञान ,गणित शिक्षक,विज्ञान प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.पुस्तकाचे प्रकाशन अकोल्याच्या शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर मॅडम यांचे हस्ते तसेच एन सी. टी. यस इंडिया चे चेअरमन डॉ. चंद्रमौली जोशी,डॉ अभय यावलकर संचालक मूलभूत कृतीशील विज्ञान आणि सौर ऊर्जा शिक्षण केंद्र, ए. पी. जे. अब्दुल कलाम, नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे उपाध्यक्ष सुनिल वानखेडे, डॉ रवींद्र भास्कर(अध्यक्ष, अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ)डॉ गजानन नारे,लेखिकेचे वडील शालीग्राम सावळे, पती डा.के. ओ.तायडे प्रा.प्रशांत सावळे या सर्वांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ .पाटेकर मॅडम यांनी म्हंटले की उज्वला तायडे यांच्यासारख्या विज्ञान शिक्षिका विज्ञानविषयक लेखसंग्रह लिहितात ही निश्चितच कौतुकाची, अभिमानाची गोष्ट आहे. या लेखसंग्रहात आशयाबरोबरच तंत्र व लेखन यामध्ये वेगळेपण असून ओघवत्या शैलीमध्ये लिखाण केले आहे.पुस्तकात लेखिकेने विज्ञान आणि ललित यांची सांगड घालून सांन थोरांना दैनंदिन जीवनात पडलेले प्रश्न, अवतीभवती घडणाऱ्या घटनांमधील विज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या लेखांतून वास्तववादी विज्ञान मांडले. मुलांमध्ये कुतुहलामुळे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न ऐकून’कुतूहल’जागृत होतं. का?कधी?कुठे?कसे?केव्हा अश्या प्रश्नांचे समाधान जिज्ञासू, अभ्यासू वाचकांस100%’कुतूहल’च्या माध्यमातून होणार आहे.
असे बोलून शुभेच्छा दिल्या.पुस्तकाला प्रस्तावना डॉ.साधना कुलकर्णी यांनी दिली.
पुस्तक मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती कडून करण्यात आले आहे.


