रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हाराचे सल्लागार सदस्य श्री सुरेशभाऊ कोल्हे व महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.पद्मावतीताई कोल्हे(टिकार) यांचा मुलगा डॉ. धनंजय ह्याने रशियामधून एम.बी.बी.एस.पदवी मिळवल्याबद्दल जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हाराच्या वतीने बेलखेड येथे शॉल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना श्रीधरभाऊ टोहरे यांनी धनंजयच्या धाडसाचे कौतुक केले तर धनंजयचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहन जगतगुरु प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कराळे ह्यांनी केले.सत्काराला उत्तर देतांना डॉ.धनंजय ह्याने रशिया मधील आपले अनुभव कथन केले व मुलींच्या शिक्षणासाठी रशिया हा अतिशय सुरक्षित देश असल्याचे सांगितले. ह्यावेळी मंडळाचे सचिव राजेश बुरघाटे, गजानन लासुरकार, दादा टोहरे,विलास घुंगड,प्रा.मनिष गोरद, मनिष खुमकर,लक्ष्मण धांडे, करण टोहरे इत्यादी उपस्थित होते.