अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे तात्काळ मिळण्याबरोबरच सततच्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे, कांदा उत्पादक शेतकरी व नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे . त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, नुकताच दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ऑनलाइन सेतू माध्यमातून मिळालेली कोणतीही कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. तरीही कागदपत्रे तातडीने देण्याची मागणी शिवसेनेने जोर धरून ठेवली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे.मागील काळात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके हातची गेली आणि गारपिटीमुळे उन्हाळी पिकांचेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ते पीक हाताबाहेर गेले आहे. त्यानंतरही त्यांना तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.त्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र मुर्तडकर व शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तडकर, युवासेना तालुकाप्रमुख सागर रामेकर, निवासी उपतालुकाप्रमुख अनिल निमकंडे, शहर प्रमुख निरंजन बंड, परसराम उंबरकर, अंबादास देवकर, संतोष सरदार, गोपाल ढोरे, सुरज झळपे, आसिफ भाई, अब्दुल मुक्तार भाई, विशाल तेजवाल, कैलास बगाडे, सचिन गिरे, आनंद तायडे, दिनेश काळपांडे, श्याम कराळे, विलास वाहोकार आदी शिवसैनिक उपस्थित होते.


