किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आज रोजी शेतकरी दिनाचे औचित्य साधून पातुर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले दुर्गम भाग मौजे सावरगाव तालुका पातुर जिल्हा अकोला येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात शेतकऱ्यांना विविध योजने बद्दल माहिती देण्यात आली. व तसेच उन्हाळी सोयाबीन उत्पादन, रब्बी पिकावरील कीड रोग मार्गदर्शन, सेंद्रिय शेती कृषिमाल विपणन, PMFME, व सर्वात महत्वकांक्षी अशी असलेली महाडीबीटी योजनेची माहिती देण्यात आली. व तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यांचे निरासन करण्यात आले.सदर कार्यक्रमास माननीय (तालुका कृषी अधिकारी पातुर डी. एस. शेटे) व (मंडळ कृषी अधिकारी चान्नी एस.एम.अटक.)( कृषी पर्यवेक्षक चान्नी 2 जी. एम. डीके.)(कृषी सहाय्यक एस एस पवार) व सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी देविदास धोत्रे सावरगाव चे सरपंच गजानन बलक प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर नागलकर,अमोल माडोकार, गोपाल राठोड, श्रीकृष्ण डवंगे व तसेच उमरा झरंडी वसाली शिवारातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


