गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तालुक्यातील मनब्दा ग्राम पंचायत प्रशासनाने नागरिकांच्या स्वमालकीच्या मालमत्ता क्र. ६१/१ मधील शौचालयाचे टाके बेकायदेशीर पणे फोडून तिथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तसेच मालमत्ता क्र. ६३/१ च्या प्रांगणातील कडू लिंबाचे झाड अवैधपणे तोडून त्याची परस्पर विक्री केल्याची तक्रार दि. १७ डिसेंबर रोजी तक्रारदार गोपाल हरेश गतमने यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे आली आहे. करण्यात
तेल्हारा तालुक्यातील ग्राम मनब्दा येथील रहिवासी गोपाल गतमने यांच्या मालकीच्या नमूद मालमत्ता क्रमांकातील घर बंद असल्याची संधी साधून ग्रा.पं. प्रशासनाने शौचालय टाके फोडल्याने गावात रोगराई पसरण्याची शक्यता तक्रारदाराने व्यक्त केली आहे. तद्वतच तक्रारदाराने घराचे प्रांगणात जगविलेले कडू लिंबाचे मोठे झाड परवानगी न घेता गैरकायदेशीर पणे ग्रा.पं. प्रशासनाने तोडल्याप्रकरणी तात्काळ दखल घेवून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दोन स्वतंत्र निवेदनातून करण्यात आली आहे. शौचालयाचे टाके फोडल्या प्रकरणी निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. अकोला, तहसीलदार तेल्हारा, गटविकास अधिकारी पं. स. तेल्हारा यांना तर वृक्षतोड प्रकरणी निवेदनाची प्रतिलिपी वन विभाग अधिकारी अकोट यांना पाठविण्यात आल्या आहेत.


