अभ्युदय फाऊंडेशनची अद्भभूत कामगीरी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर स्मशान भुमीची बिकट अवस्था झाली होती काही आमदारानी येथील विकासाच्या कामासाठी चांगला निधी सुध्दा दिला परतुं स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे याठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण होवून याची दुर्गती होण्यास काहीच वेळ लागला नाही.अशा परिस्थितीत शहरात सेवाभावी वृत्तीने समाजात काम करून मनुष्यासोबत प्राण्यांसाठी ही निष्काम सेवा देणाऱ्या अभ्युदय फाऊंडेशनचा एक आशेचा किरण उदयास आला.
अभ्युदय फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष गोपाल गाडगे व सचिव बंटी भाऊ ऊर्फ गोविंदसिंह गहीलोत व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेवुन या स्मशान भुमीचा जीर्णोद्धार करत याचा कायापालट करण्यास सुरवात केली.स्मशान भुमीच्या भिंतींवर सुंदर चित्र रेखाटले, छान असा बगीच्या,वृद्ध लोकांना बसण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बाकडे,मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेज व माइक व्यवस्था,पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था, आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था, एखाद्या मयत व्यक्तींच्या अस्थिविसर्जनासाठी जर विलंब होत असेल तर अशांसाठी मोफत लाॕकरची व्यवस्था,वैकुंठ रथाची व्यवस्था, नागरिकांना अंत्यविधी वेळी सहकार्य मिळावे यासाठी स्मशान जोगी ची व्यवस्था.
एक गरजू स्मशान जोगी आपल्या लहान मुला मुलींसह आपल्या परिवारासह कुटुंबाचे उदर निर्वाह करण्यासाठी या स्मशान भूमि मध्ये आपली त्याच्या परिवारासह रात्रंदिवस 24 तास सेवा देत आहे.येथे येणा-या प्रत्येक मयत व्यक्तीचा अंत्यविधी शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे त्यामुळे मृतकांच्या दुःखी परिवाराचे मन अंत्यविधीचा कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पडत असल्याने समाधानी होत आहे स्मशान जोगी यांना अभ्युदय फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा पगार हा पदाधिकाऱ्यांच्या स्वखर्चातुन देण्यात येत आहे अशा अनेक योजना ही सेवाभावी संस्था राबवित आहे. यावेळी शहरातील काही समाज सेवक तसेच काही परिवारांनी पुढाकार घेत अस्थी कलश लाॅकरची सुविधा ठाकूर बबलू बायस,पप्पू पैठणकर,सतीश कवले व मित्र परिवाराकडून ही भेट देण्यात आली, तर निमकंडे परिवारा कडून आंघोळीसाठी गरम पाण्याच्या सुविधेकरिता रोख रक्कम देऊन मदत करण्यात आली तर फुलारी परिवाराने सुद्धा पुढाकार घेत शुद्ध व शितल जल फ्रिजर ची मदत केली आहे,पातुर येथील उमाळे परिवाराकडून रंगीबिरंगी व विविध जातींच्या फुलझाडांच्या सुंदर अशा कुंड्याचे सुशोभिकरण करण्यात आले,नुकतेच अकोला येथील हिवराळे ज्वेलर्स चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते मनीषभाऊ हिवराळे यांनी त्यांच्या मुलांचे सृती प्रित्यर्थ व्हील चेअर दान दिली आहे. तसेच राधाकृष्ण मंदिर पातुरच्या वतीने अंघोळीसाठी टप बकेट देण्यात आल्या आहेत. तर शंकर भगवान नटराज मूर्ती पातुर येथील शिवभक्त तेजवाल परिवारा कडून बसवण्यात आली,महत्त्वाच्या वस्तूंना ठेवण्याकरिता कृष्णा इलेक्ट्रॉनिक संचालक नितीन राऊत यांनी कपाटाची सुविधा केली आहे तर प्रकाशभाऊ वानखडे यांनी फावडे टोपले या ठिकाणी भेट दिले. अशा अनेक परिवाराने पुढाकार घेऊन कोणी बसण्यासाठी बाकडे तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीची मदत करण्याकरिता पुढाकार घेत आहे तर अभ्युदय फाऊंडेशनने पातुर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपण सुद्धा मदतीचा हात पुढे करून आपल्या पूर्वज व कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नावाने काहीतरी छोटीशी भेट देऊन त्यांचे नाव अजरामर होण्यासाठी मदतीचा हात समोर करावा असे आव्हान केले आहे. शहरातील नागरिकांना मेल्यानंतर त्यांच्या अंतिम क्षणात अशा चांगल्या वातावरणात जगाचा निरोप घेण्यास भाग पाडणा-या अभ्युदय फाऊंडेशन हे एक वरदान ठरत आहे.
अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून येणारे मृताकांचे नातेवाईक सुद्धा या स्मशानभुमीत असलेल्या सुख सुविधा विषयी चांगली चर्चा करतांना दिसतात,अभ्युदय फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे सचिव बंटी ऊर्फ गोविंदसिंह गहीलोत,डॉ संजयसिंह परिहार,प्रवीण निलखन,दिलीप निमकंडे,प्रशांत बंड व त्यांचे इतर सहकारी यांचे पातूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करत आभार व्यक्त करत आहेत.