सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मुर्तिजापूर
मूर्तिजापूर : तालुका क्रीडा संकुल सिटी तायक्वोडो क्लब कृष्ण कामिनी बहुउद्देशीय संस्था फिटनेस अकेडमी नेहरू यूवा मंडळ अकोला जिल्हा टेनी क्वाईट बॉल बॅडमिंटन तलवारबाजी नेटबॉल रग्बी खो खो वुडबाॅल थ्रो बाॅल यांच्या संयुक्त विद्यमानाने मूर्तिजापूर येथे जयस्तंभ चौक ते क्रीडा संकुल पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुर्तीजापुर नगरपालिकेचे उपाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली व सुरुवात केली रॅलीमध्ये मुलांसोबत पुरुषांनीही सहभाग दर्शविला यामध्ये सेंट ऑन्स हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश ताले दिनेश श्रीवास नगरपालिका चे गांधीजी हितेश चौबे दिवाकर सोनवणे यांनी सायकल चालवली. समारोपाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र सचिव अतुल इंगळे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अविनाश बांबल तलवारबाजी संघटनेचे सचिव संजय इसाळकर चंदन अग्रवाल विनोद काळपांडे मुन्ना श्रीवास संतोष माने ज्येष्ठ शिक्षिका मीना गावंडे प्राध्यापक यादव मॅम हे उपस्थित होते मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना समजून सांगितले की त्यांना हाॅकीचा जादूगर का म्हटले जाते त्याचप्रमाणे गजानन वर्घट यांनीही मेजर यांची जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विलास वानखडे, प्रेमराज शर्मा, आशुतोष दुबे, प्रतीक येदवर, सुनील भोजगडीया, दिवाकर सोनवणे, रवी गोंडकर, दिलीप गोसावी चौबेजी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालक ज्ञानेश ताले व आभार प्रदर्शन गजानन वर्घट यांनी केले.