अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : स्वतंत्र्याच्या अमृत महोसानिमित्त पातुर वर्षा महोत्सव 2022 या कार्यक्रमाचे आयोजन पातुर पंचायत समितीचे महात्मा फुले बचत भवन सभागृहांमध्ये करण्यात आले होते.गेल्या तब्बल 22 वर्षापासून कै म. ल. मानकर स्वच्छता व कौशल्य विकास प्रकल्प द्वारा अकोल्यात भारत सरकारचा वृक्षमित्र पुरस्कार पटकाविणारे रुपसिंग बागडे आणि त्यांच्या पत्नी माला बागडे दरवर्षी अकोला वर्ष महोत्सव आयोजित करीत असतात या वर्षी त्यांनी पातूर वर्षा महोत्सवाचे आयोजन पातुर येथे केले होते.या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक अशी सकस नृत्य सादर करून नृत्याचा जल्लोष सादर करून रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे उदघाटन बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ सावित्रीबाई राठोड तर गजानन खानंदे राज्यकर उपायुक्त मुंबई,सौ लक्ष्मीताई डाखोरे सभापती पातुर, सौ अर्चना ताई डाबेराव उपसभापती पातूर, विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव, धीरज मदने वनपरिक्षेत्र अधिकारी पातूर, नायब तहसीलदार विजय खेळकर, पंचायत समिती सदस्य इमरान खान, पंचायत समिती सदस्य ऍडव्होकेट सुरज झडपे, पंचायत समिती सदस्य गोपाल भाऊ ढोरे, जनार्दन डाखोरे, माजी सभापती पप्पू देशमुख, प्रदीप भाऊ बनारसे, पंचायत समिती सदस्य निमा राठोड, गटशिक्षणाधिकारी उल्हास घुले, गटविकास अधिकारी डॉक्टर उल्हास मोकळकर, हिरासिंग भाऊ राठोड , सुनंदा जावरकर विस्तार अधिकारी, दिपमाला भटकर विस्तार अधिकारी, जयंता सोनवणे कृषी अधिकारी तसेच पत्रकार बांधवांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी विद्यार्थ्याचे नृत्य कलेचे अभिनंदन करून मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या कला विकास आणि कार्यक्रमाकरिता 75 हजाराची त्यांनी यावेळी बक्षीस मदत केली तर या कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांनी 5001 रुपयाची बक्षीस मदत केली तसेच सभापती सौलक्ष्मी ताई डाखोरे यांनी 5001 रुपयाची बक्षीस देऊन मदत केली. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरता गटविकास अधिकारी डॉ उल्हास मोकळकर गटशिक्षणाधिकारी उल्हास घुले अशोक शिरसाट यांनी सुद्धा गीतांचे सुंदर गायन करून रसिकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पातुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर उल्हास मोकळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पातूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रूपसिंग बागडे आणि सौ माला बागडे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पातुर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व पालक वर्गाने या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले आहे.

