सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण
उरण: ५ ते ६ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे दुर्दैवाने घटनेत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी द्रोणागिरी गडावरील दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही दुर्दैवाने घटना घडली नाही. तरी प्रशासनाने घटनास्थळी जाऊन द्रोणागिरी गडाच्या आजुबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना व इमारतीमधील लोकांना घरे खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याचे समजते. परंतु रहिवाशी हलण्यास राजी नसल्याचे दिसते. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तालुक्यातील दरडगस्त वाड्यांचे सव्हेॅ करून धोकादायक रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे.गेली अनेक वर्षांपासून ऐतिहासिक असलेल्या द्रोणागिरी गडावरील चारही बाजूने पोखरून मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.सतत घडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक द्रोणागिरी गडाला भगडाद पडत दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मात्र भविष्यात द्रोणागिरी गडावर कधीही भयानक दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने येथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. परंतु प्रशासनाच्या हाकेला रहिवाशी हलण्यास तयार झाल्याचे दिसून येते.