संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे व डॉक्टर राज अहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुल बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा या उद्देशाने ,तसेच त्यांना दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने, शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय” श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धा 2023″ चे आयोजन केले आहे. स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी तसेच खुला गट अशा तीन गटात घेतली जाईल. यामध्ये भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत आणि गझल यापैकी कोणतेही एक पाच मिनिटाचे गाणे सादर करावयाचे आहे. बक्षिसे -इयत्ता पाचवी ते आठवी गटासाठी प्रथम क्रमांकास 1500/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास 1000/- रुपये व आकर्षक चषक ,तृतीय क्रमांकास 800/- रुपये व आकर्षक चषक तसेच उत्तेजनार्थ साठी प्रमाणपत्र दिले जाईल . इयत्ता नववी ते बारावी गटासाठी प्रथम क्रमांक 2000/- व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 1500/- व आकर्षक चषक तृतीय क्रमांक 1000/- आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थसाठी प्रमाणपत्र खुलागट – प्रथम क्रमांकाला 2500/- रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाला 2000/- रुपये व आकर्षक चषक ,तृतीय क्रमांकला 1500/- रुपये व आकर्षक चषक ,उत्तेजनार्थला प्रमाणपत्र दिले जाईल.स्पर्धेचे नियम असे -आहेत 1)सदर स्पर्धा ही एकल गायन स्पर्धा आहे 2) गाणे सादर करण्याची वेळ पाच मिनिटे असेल चार मिनिटांनी सूचना केली जाईल 3) सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे 16 ऑगस्ट 2023 पर्यंत पोहोचतील अशी पाठवावीत 4) वादक व वाद्य उपलब्ध होतील 5) प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल 6) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही .7) अंतिम फेरी दिवशी स्पर्धकांना माध्यम भोजनाची व्यवस्था केली जाईल. 8) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.