डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
नांदेड – जालना या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. त्यात सेलू तालुक्यातील अत्यंत सुपीक जमिनी या महामार्गात मोठ्या प्रमाणात जात आहेत. परंतु सरकार मात्र दुजाभाव करीत कालबाह्य झालेल्या महाराष्ट्र महामार्ग कायदा १९५५ कायद्यानुसार जुजबी भावाने जमीनी हडप करीत आहे.या निर्णयाला विरोध करून सरकारने पारदर्शकता व पुनर्वसन कायदा २०१३च्या कायद्यानुसार जमीनी अधिग्रहित कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने पुकारलेल्या ‘प्रचंड सत्याग्रह आंदोलनात’ माजी जि.प.बांधकाम सभापती अशोक काकडे हे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी
सहभागी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सहभागी झालो आहे अशी भूमिका मांडली आणि शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार असल्याचे सांगितले.यावेळी कॉ.राजन क्षिरसागर यांच्यासह, विविध पक्ष -संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर सहभागी होते.


