रमेश शिंगोटे
तालुका प्रतिनिधी, संगमनेर
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्या प्रेरणेने जय हिंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दंडकारणय अभियान वृक्षारोपण कार्यक्रमाचा जनजागृती निमित्ताने आज निझणेश्वर विद्यालय कोकणगाव तालुका संगमनेर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी दंडकारण्य अभियानाचे सन्माननीय प्राध्यापक बाबा खरात सर, श्री बर्डे मामा, श्री दिघे सर, मुख्याध्यापक श्री. वाकचौरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. बाबा खरात यांनी आपल्या जीवनातील वृक्षांचे महत्व, उपयोग याविषयी मुलांना मार्गदर्शन केले वृक्षारोपण विषय विविध गीतांची मैफिल विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी सादर करून विद्यार्थ्यांचे मन वृक्षारोपणाकडे आकर्षित करण्याचे काम त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.यावेळी व्यासपीठावर श्री घोडे सर खरात सर श्री खेमनर सर श्री कांबळे सर श्री राहणे सर उपस्थित होते.प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाकचौरे सर यांनी केले आभार श्री .रावतळे बीएम सर यांनी केले व सूत्रसंचालन गोसावी सर यांनी केले.










