शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : धुलिवंदन साठी वापरण्यात येणार रानावनात बहरलेला पळस देतोय धुळवड आल्याचा संदेश परंतु रंगाची उधळण करणाऱ्यांना केमीकल युक्त रंगाचे दुष्परिणाम लक्षात येताच पुन्हा नैसर्गिक रंगांकडे बहुतेकांचा कल वाढत आहे. रानावनात बहरलेला पळस पाहून ‘होळी आणि पळस, पांगारे भडक लाल, अंगाला माखून येती गुलाल, रानात पेटलेनली फुलांची आग, अवघ्या बना ये नवखी जाग येती, या कवितेच्या ओळी ओठांवर येतात. काही हौशींनी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आतापासूनच पळस फुले गोळा करणे सुरू केले आहे. त्यापासून नैसर्गिक रंग कसा तयार केला जातो, याची उत्सुकता चिमुकल्यांना लागून राहिली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. निसर्गही आपल्या विविध छटा दाखवत आहे. रानावनात फुललेला लाल चुटूक, केशरी पळस होळी जवळ आल्याचा संदेश देत आहे, तर कोरोनाच्या ओसरलेल्या तिस-या लाटेनंतर येणारा पहिला सण होळी आहे. विविध रंगाची उधळण करण्यात येणार आहे. होळी व धुळवडीच्या चाहूल लागताच प्रत्येकाच्या मनात रंगांची उधळण सुरू होते. रंगांच्या या उत्सवाने जाती-धर्माच्या सीमारेषा कधीच पुसून टाकली आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे सण, उत्सवांवर मर्यादा आली होती. परंतु आता कोरोनाची लाट ओसरताच या वर्षी मनसोक्त होळीचे रंग उधळता येतील म्हणून आबालवृद्ध खुश आहेत. पूर्वी पळस फुलांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर होळीसाठी केला जात होता. मात्र कालौघात त्याची जागा रासायनिक रंगांनी घेतली, पुर्वी पळस फुलापासून होळीचा रंग रंगपंचमीला पूर्ण नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असे त्यासाठी प्रमुखाने पळसाच्या फुलांचा उपयोग केला जात असे पळसाची फुले 2 ते 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवून त्यापासून रंग तयार केला जात होता मात्र दरम्यानच्या काळात रासायनिक रंगांना मागणी वाढली व नैसर्गिक पळसाच्या फुलांचा रंग वापरात कमी झाला परंतु रासायनिक रंगांचे व त्यापासून होणारे दूष परिणाम लक्षात येता पुन्हा इको फ्रेंडली रंगांना प्रधान्य दिल्या जात आहे व आता पळसाच्या फुलांचा रंग धुळवड साजरी करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे मत अनेक सुध्न नागरिकांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे या वर्षी ची धुळवड पळसाच्या फुलांच्या रंगांची होनार आहे.