सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली,मुलचेरा,कोरची,अहेरी, सिरोंचा,चामोर्शी,धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायतींचा 20 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात आले.या निकालात काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसुन आले.धानोरा, चामोर्शी व कोरची नगरपंचायतीत काँग्रेसचे वर्चस्वं मिळविलेआहे.तर कुरखेड्यात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे.सिरोंचात मात्र सर्व प्रमुख पक्षांना मागे सारत आविसचा बोलबाला पाहायला मिळाला.सिरोंचात 10 आविसचे उमेदवार निवडून आले आहेत.चामोर्शी नगर पंचायत एकूण 17 जागापैकी
भाजपाला-03,काँग्रेस-08,राष्ट्रवादी काँग्रेस-05,शिवसेना-0असुन या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे.सिरोंचा नगरपंचायत एकूण 17 जागापैकी भाजप-0,काँग्रेस- 0,राष्ट्रवादी काँग्रेस-05,शिवसेना- 02,आविस-10,या ठिकाणी अाविस ने एकहाती सत्ता मिळविली आहे.मुलचेरा नगरपंचायतीत एकूण 17 जागापैकी भाजपाला-01,काँग्रेस-0
राष्ट्रवादी काँग्रेस-06,शिवसेना-04,
अपक्ष-06 उमेदवार निवडुन आले आहेत.कुरखेडा नगरपंचायत एकूण 17 जागापैकी भाजप-09,काँग्रेस-03,
राष्ट्रवादी काँग्रेस-0,शिवसेना-05 अपक्ष-0,कोरची नगरपंचायत एकूण 17 जागापैकी भाजप-06,काँग्रेस-08,
राष्ट्रवादी काँग्रेस-01,शिवसेना-0,
अपक्ष-02,धानोरा नगरपंचायत एकूण 17 जागापैकी काँग्रेस-13,भाजप -03,अपक्ष-01,अहेरी नगर पंचायत एकूण जागा 17 जागापैकी भाजप -06, शिवसेना-02,राष्ट्रवादी-03,
आविस -05.एटापल्ली नगरपंचायत एकूण 17 जागापैकी भाजप-3,
काँग्रेस-05,राष्ट्रवादी काँग्रेस-03,
शिवसेना-0,आविस- 02,अपक्ष- 04.
भामरागड 17 वार्डांपैकी 16 चा निकाल घोषित करण्यात आले.त्यापैकी शिवसेना-01,भाजपा-05, कॉंग्रेस- 02,राष्ट्रवादी कॉंग्रेस-03,
अपक्षाचे 05 उमेदवार निवडुन आलेले आहेत.


