पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा महामार्गावर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला
त्यात पति , पत्नी ठार झाले तर
मुलगी गंभीर जखमी झाली . अपघातग्रस्त ट्रक व दुचकिवरील तिघेजन औश्याकडे एकाच दिशेने जात होते . ओव्हरटेक करताना हा अपघात घडला .
राजू राठोड (46 ) व शकुबाई राजू राठोड (40) रा. वांजरखेड़ तांडा ,
ता . भालकी , जि . बीदर असे अपघातात ठार झालेल्या पति पत्नीचे नाव आहे . लातुर औसा महामार्गावरून राजू राठोड , शकुबाई राठोड व मुलगी स्वाती राठोड हे तिघेजन जात होते . लातुरहुन सोलपुरकडे ट्रक ( टीएन 34, एझेड 2008 ) हा जात होता . तेव्हा वोव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोटारसाकलची ट्रकला खडी केंद्राजवळ जोराची धडक बसली . त्यात दुचकिवरील तिघेही ट्रकच्या चाकाखाली अडकले . या अपघातात शकुबाई यांचा जागीच मृत्यु झाला . गंभीर जखमी असलेल्या वडील व मुलिस लातुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता राजू राठोड यांचा मृत्यु झाला . मुलगी स्वाती (17) ही गंभीर जखमी असुन तिच्यावर उपचार चालू आहेत . घटनास्थळाला पोलिस उप निरीक्षक शंकर पटवारी , सहायक पोलिस निरीक्षक डोंगरगे यांनी भेट देऊन पाहणी केली .
औसा – लातुर महामार्गावर असून संध्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे . त्यामुळे एका बाजूने रस्त्याचे काम सुरु असून दुसऱ्या बाजूने वाहतुक होत आहे . या रस्त्याची दुरवस्था झाली आहे मोठमोठे खड्डे पडले आहेत . त्यामुळे महामार्गावर सतत छोटे छोटे अपघात घडत असल्याचे पहावयास मिळत आहेत . हा अपघात इतका भीषण होता की , दुचकीवरील एकाचा एक पाय तुटून वेगळा पडला होता . तसेच घटनास्थळी रक्तमासांचा सडा पडला होता . पोलिसांनी घटनास्थळी सर्व प्रकारची पाहणी केली .