अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातुर:- 26 जुलै 2021 सोमवार स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक एक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले.11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे कर्नल संजय पांडे आणि कर्नल अशोक कुमार यांच्या नेतृत्वात 22वा कारगिल विजय दिवस साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले ,त्या अनुषंगाने तुळसाबाई कावल विद्यालय पातुर ,येथे राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले “एक विद्यार्थी एक झाड” या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाला एनसीसी कॅडेट्स आणि हरित सेना चे विद्यार्थी कोरोना नियमांचे पालन करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला सौ. स्नेहप्रभादेवी गहिलोत सचिव, विजयसिंह गहिलोत व्यवस्थापक, प्राचार्य बी. एम. वानखडे, उपप्राचार्य एस. बी. ठाकरे, अंशुमनसिंग गहिलोत, हरित सेना प्रमुख सी.आर. साळुंखे आणि एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे हजर होते.