योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (२६ जुलै) – मनात ध्येय आणि चिकाटी असेल तर सर्व काही शक्य होतं.याच ध्येयाने प्रेरीत होवून १४ आँक्टोबर २०२० रोजी विजया दशमीच्या मंगलदिनी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र (रत्नागिरी ) हि कोकणातील पहिली वैचारिक परिवर्तन करणारी साहित्यिक संस्था होय. खर तरं बुध्द ,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वसा जोपासत, महाराष्ट्रातील आंबेडकरी साहित्यिकांना एकत्र करण्याचा संकल्प आज पूर्णत्वास नेत असताना एक प्रकारचा अनामिक आनंद प्राप्त झाला आहे.
आंबेडकरी साहित्यिक हा प्रत्येक घरोघरी दडलेला आहे, त्यांनी केलेले लेखन आज बंद पेटीत बंदिस्त आहेत.अशा कवी ,लेखकांना नवे हक्काचे विचारपीठ मिळावे, तो साहित्यिक इतर साहित्यिकांच्या प्रवाहात सामील व्हावा, या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच चे कार्य नक्कीच नवकविना प्रेरणादायी व लाभदायी ठरत आहे.त्यामुळेच रत्नागिरीतून निर्माण झालेले आणि विणत गेलेले हे साहित्यिकाचं जाळ आज महाराष्ट्रातील २९ जिल्हया मध्ये आम्ही पोहचण्यासाठी कार्य जोमानं करीत आहोत.आणि या पुढे हि करत राहणार.यात शंकाच नाही.असे मनोगत साहित्यिक विचारमंच संस्थेचे संस्थापक मनोज जाधव यांनी व्यक्त केले. या ऑनलाईन काव्य उपक्रमाअंतर्गत या साहित्यिक कार्यासाठी संस्थेचे संस्थापक मनोज जाधव,संस्थापक प्रा. सुरेश कुराडे गडहिंग, कोल्हापूर संस्थापक, सुनील सुरेखा राजापूर, रत्नागिरी चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवियत्री भावना खोब्रागडे, तर उत्तम निवेदिका व कवियत्री रिया पवार,दहिसर, मुंबई, कवियत्री कांचन मून पुणे, कवियत्री वर्षा मेंढे, अमरावती कवियत्री अस्मिता सावंत, ठाणे कवी कौशल्य कांबळे, कोल्हापूर, कवी संदेश सावंत, रत्नागिरी
तर कोकण विभागीय अध्यक्ष
विनोद जाधव (मुंबई ) आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच चे प्रसिध्द ग्राफिक्सकार जितेंद्र मोहिते, खेड आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, इतर पदाधिकारी आणि सहभागी सर्व आंबेडकरी साहित्यिक मित्रांचे अनमोल सहकार्य लाभले. यामध्ये संस्थेच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम राबविल्या जात असून नव कवी मध्ये चैतन्य वाढविण्याचे काम करीत आहे. काव्यलेखनाच्या या उपक्रमांचा अर्धशतकाचा टप्पा आजघडीला पुर्ण होत आहे.या मध्ये आतापर्यतच्या सर्व काव्यलेखनाच्या उपक्रमांना महाराष्ट्रातील साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हे काव्यलेखनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणार्या संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या खंदया समर्थक भावना खोब्रागडे, चंद्रपूर तर कोकण विभागीय संघटक पूनम गमरे,मुंबई आणि ज्याच्या कडून सन्मानपत्रा चा नाविन्यपूर्ण अविष्कार पाहायला मिळतो ते ग्राफिक्सकार जितेंद्र मोहिते यांच्या मुळेच सदर काव्यलेखनाच्या उपक्रमांचा अर्धशतकाचा टप्पा पूर्ण केला आहे. एकंदरीत प्रत्येकानी समजून आणि समजावून घेऊन काम केले तर.. कधीच वैचारिक वाद होणार नाही तर आपण नेहमीच सातत्याने परिवर्तनाच्या
मार्गाने पुढे जाणार आहोत.
महाराष्ट्रा मध्ये खरतरं लाँकडाऊनच्या काळात अनेक समुह, संस्था उदयाला आल्या. त्या मध्ये आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी चे काम सर्वांच्या सहकार्याने कौतुकास्पद असून नक्कीच नाविन्यपूर्ण असे आहे.
या पुढे हि सर्वांचे असेच अनमोल सहकार्य आपल्या डॉ. बाबासाहेव आंबेडकर साहित्यिक विचारमंचला मिळत राहो, आपण हि भविष्यात संस्थेचे काम संपूर्ण भारतभर पोहचविण्यासाठी प्रयत्न करू पण त्यापुर्वी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत असायला हवा आणि तो सोबत आहे. चला तर मग परिवर्तन करूया
आंबेडकरी साहित्यिकांना साहित्यिक प्रवाहात सहभागी करून घेऊ या असेही यावेळी मनोज जाधव यांनी प्रसिद्धी प्रत्रकात म्हटले आहे.
आतापर्यन्त राबविण्यात आलेले उपक्रम.
1)रत्नागिरी येथील पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन
2) 9 वे राज्यस्तरीय ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन
3)डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच व पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विधमाने महाराष्ट्रातील कोरोना काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या 1000 हुंन अधिक मान्यवरांना “कोविड योद्धा” सन्मान पत्र देऊन गौरव केला.
4)प्रत्येक जिल्हा कमेटीच्या माध्यमातून सातत्याने नावीन्यपूर्ण राबविले जात आहे.
5)विशेष बाब म्हणजे नवं कविंना त्यांच्या लेखणीला प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक उपक्रम राबविले.