सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
मागील पाच सहा दिवसापासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनसिंग येथून जवळच असलेल्या वसंतवाडी येथे बंधारा फुटल्या मुळे अशोक रामजी राठोड यांच्या गट नंबर 4 व गट नंबर5 मधील उभे पीक वाहून गेल्यामुळे सदर शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे आधीच महागाई व त्यात हातचे पीक वाहून गेल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे











