अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव तालुक्यातील मेडशी येथील पोलीस पाटील सौ अनिताताई सुधाकर चोथमल यांची पोलीस पाटील संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ वाशिम च्या वतीने मंगरुळपिर येथील पंचायत समिती सभागृह जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील,राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील, पुणे जिल्हा सदस्य नामदेवराव घोरपडे पाटील ,शिरूर पोलीस पाटील निलेश बोरकर, हरीश महाकाळ सभापती मंगरूळपीर, ठाणेदार जगदाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.मेडशी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील अनिताताई चोथमल यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदासाठी अनिताताई चोथमल यांच्या नावाची घोषणा केली. याप्रसंगी अनिताताई चोथमल यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस कर्मचाऱ्यासह
संघटनेचे जिल्हा व तालूका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पोलीस पाटील संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने मोठी जबाबदारी शिरावर आहे.संघटनेच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ न देता पोलीस पाटीलांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याचे अनिताताई चोथमल यांनी यावेळी सांगितले.