योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चिमूर (०६ जुलै)- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे आज सार्वजनिक चौका मधील आवारात आज ६ जुलै २०२१ ला सायंकाळी ५.०० वाजता जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपुर व कला पूर्वी बहुउद्देशीय संस्था पोभूर्ण द्वारे कोरोनाच्या लसीकरणची व्यापक प्रसिद्ध करिता व जाणीवजागृती पर कलापथक सादर करण्यात आली राष्टीय कुटुंब अभियान बद्दल सुद्धा जागृती करण्यात आली.शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र गीता द्वारे कलापथकला सुरवात करण्यात आली यात कोरोनाचा प्रकोपला आळा कसा घातला जाईल या बद्दल सुंदर गीता द्वारे जागृती करण्यात आली.या वेळी सरिता गुरनुले,हाफिज शेख,प्रभाकर गजभिये,संजय सोनेकर ग्राम पंचायत सदस्य, ग्राम पंचायत सचिव,विकास खोब्रागडे संगणक परिचालक,गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील ग्राम पंचायत सदस्य ग्राम पंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते










