किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सभागृहात ठराव मंजूर करण्यात येत होता. त्यावेळेस त्या ठरावा मध्ये काही चुका होत्या आणि त्या चुका दुरुस्त करण्याकरिता विरोधी पक्षातील आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना वेळ मागितला असता. त्यांच्याकडून कोणताही वेळ न देता ठराव वाचण्यात येत होता.
त्यामुळे विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे 12 आमदारांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभा अध्यक्ष यांना चांगलेच धारेवर धरले. सत्तेचा गैरवापर करुन त्यांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. या निलंबना विरोधात ,आज दि ६-७-२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले व त्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे , अशी मागणी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने करण्यात आली व तहसीलदाराना याबाबत निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आले अशी माहिती भाजपा पातुर तालुकाध्यक्ष रमण जैन यांनी दिली.
याप्रसंगी उपस्थित म्हणून मार्तण्डराव मोकळकर ,गजानन निमकाळे ,चंद्रकांत अंधारे ,भिकाजी धोत्रे ,श्रीकांत बराटे ,अनंत बगाळे ,राजु उगले ,अभिजीत गहिलोत ,कपिल खरप ,वैशाली निकम ,ॲड.रुपाली राउत ,मंजुषा लोथे ,संगिता गालट ,मंगेश केकन ,विनेश चव्हाण ,गोपाल गालट ,सचिन बारोकार ,गणेश गीरी ,सचिन बायस ,अजय लासुरकर ,संतोष शेळके ,निलेश फुलारी ,संतोष ईंगळे ,गजानन शेंडे ,विट्ठल कवर ,नितीन राऊत ,धनंजय गालट उपस्थित होते