रितेशकुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड : येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे आयआयटी झालेले व राईज कोचिंग क्लासेसचे संचालक श्री भरत राठी सर यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद व चर्चा केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून निमिता गांधी मॅडम उपस्थित होत्या. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चासत्रामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी, वेळेचं नियोजन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा संघर्षमय प्रवास सुद्धा विद्यार्थ्यांनसमोर मांडला इयत्ता दुसरी पर्यंतच प्राथमिक शिक्षण त्यांचे हिवरखेड येथेच झालेला असून तिसरीपासून त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी अकोला येथे पाठवलं वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना अकोला येथे आपल्या आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घ्यावं लागलं. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांनी या वयामध्ये फक्त तीन गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास आपण कसा करू शकतो. त्याचबरोबर शालेय शिक्षण हे किती महत्त्वाचा आहे कोचिंग क्लासेसला जेवढे महत्त्व दिले जाते त्यापेक्षा जास्त महत्त्व हे आपल्या शालेय शिक्षणाला आहे असं त्यांनी स्वतःच्या अनुभवातून अधोरेखित केलेला आहे कारण नववीचा आणि दहावीच्या अभ्यासावरच तुमचा अकरावी आणि बारावीचं वर्ष आधारित असतं असे त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर नववी आणि दहावीच्या वयामध्ये विद्यार्थ्यांनी कोणता तरी एक छंद जोपासला पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामध्ये सांगितलं तुम्ही ग्रामीण भागात जरी राहत असले तरी तुमची विचारसरणी ही आधुनिक असली पाहिजे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये फिजिक्स आणि गणित या दोन विषयांना तुम्ही जेवढे जास्त महत्त्व द्याल तेवढे तुमचं करिअर डिसाईड करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सहज आणि सोपं जाईल. त्याचबरोबर करिअर डिसाईड करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत हेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी अत्यंत सहज आणि विनम्र शैलीमध्ये दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर दिलीस त्यावर उपाय सुद्धा विद्यार्थ्यांना सुचवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सरांनी केलं तर आभार चंद्रकांत तिवारी सर यांनी व्यक्त केले.