स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील महाराष्ट्रात ख्याती असलेल्या प्रसिद्ध असे श्री चिन्मुर्ती संस्थांचे गादी परंपरेनुसार सध्या स्थापित श्री प.पु. माधवानंद महाराजांचे माहूर कडे प्रस्थान कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी परशुराम सेवा समितीचे सभासदांनी उमरखेड शहरातील भाविकांसाठी अन्नदान व महापूजा करण्यात आली. यावर्षीचा होणारा चातुर्मास स हा माहूर येथे होणार असून. या चातुर्मास ला रोज हजारो भावीक उपस्थित राहून. महाप्रसादाचा लाभ घेतील . माधवनंद महाराजांचे मराठवाड्यात हजारो भक्तगण आहेत. श्री चिन्मय मूर्तीचे कुलमुखत्यार एडवोकेट महेश कनकदंडे यांनी सांगितले. त्यानिमित्त आज श्री चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेड येथे परशुराम सेवा समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसे नेहमीच परशुराम सेवा समिती सामाजिक कार्य क्रमात आपला सहभाग नोंदवत असते. आज हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. व अतिशय भक्तिभावाने पुढील कार्यक्रमासाठी महाराजांनी माहूर दिशेने प्रस्थान केले. या कार्यक्रमात मोलाची भूमिका समितीच्या सभासदांनी सुनील वानरे, मनोज पोटे, विजय पाध्ये, संतोष देव, मधुसूदन पांडे, हेमंत चौधरी यांनी पार पाडली.


