जलील शेख तालुका प्रतिनिधी,पाथरी
पक्षाच्या आदेशानंतर नेहमीच आपल्या इच्छेचे बलिदान देणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निष्ठावान समर्थक तथा राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आ.राजेश विटेकर यांची महायुती सरकारच्या वतीने विधान परिषदेवर निवड करून परभणी जिल्ह्याला न्याय देण्यात आला.परभणी जिल्ह्यातील आणि पाथरी मतदारसंघातील प्रलंबित कामे त्यांच्यामुळे मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करत कोणत्याही पक्षात निष्ठेने काम केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते, सत्य परेशान हो सकता है पराजित नही असे प्रतिपादन शिवसेना नेते सईद खान यांनी व्यक्त केले.ते शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आ.राजेश विटेकर यांच्या सत्कार कार्यक्रमानिमित्त अंजली मंगल कार्यालय पाथरी येथे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे नवनिर्वाचित आ.राजेश विटेकर,शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान,मा.आ. नाना आंबेगावकर,शिवसेना नेते असेफ खान,सोनपेठ चे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, सारंगधर महाराज, परभणीचे माजी उपमहापौर मजुलाला,शिवसेना जिल्हाध्यक्ष नाना टाकळकर, माजी जि.प सदस्य दादासाहेब टेंगसे, शिवसेना प्रवक्ते चक्रधर उगले, पप्पू घांडगे इत्यादी सह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्तिकपणे एल.आर कदम आणि रामराव जोशी यांनी केले.