ब्युरो चिफ गोविंदा राऊत गडचिरोली
वनखी :- दि.27 मे, चामोर्शी माल ग्राम पंचायत अंतर्गत वनखी येथे आज झालेल्या लसीकरणाला ग्रामपंचायत व उमेद अभियानाच्या माध्यमातून 110 नागरिकांना लस देण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात 45 वर्षाच्या वरील लोकांना लस देणे सुरू आहे.कोविड 19 आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी लस घेणे हाच सध्यातरी उपाय आहे.परंतु लोकांमध्ये लसीकरणाबद्दल बरेच गैरसमज असल्यामुळे लस घेणारांची संख्या फारच कमी आहे.म्हणुन मागील महिनाभरापासून जिल्हा अभियान कक्षाच्या सुचनेनुसार उमेद अभियान आरमोरी तर्फे गावागावात लसीकरण करण्याविषयी जागृती करण्यात येत आहे.तसेच ग्रामपंचायत व महसुल कार्यालय स्तरावरही जनजागृती करणे सुरू आहे.काल व आज उमेद अभियानाच्या प्रेरिका यांनी गावात फिरून लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. झालेल्या लसीकरणाला 110 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. आरमोरीचे मंडळ अधिकारी वाते, नायब तहसीलदार चापले यांनी लसीकरण स्थळी भेट दिली.
वडधा आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक पी.एन.गीरडकर,एम.ई.भानारकर,वाय.एस.बोरकर, आरोग्य सेविका एस.टी.बरडे, ग्रामसेवक बि.एन.कोकोडे, वासाळा येथिल तलाठी आर.एस.करंबे, उमेद चे पशु व्यवस्थापक गोविंदा राऊत व प्रेरिका बिंदू शेंडे व निराशा उपरिकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर धंदरे, ग्रामपंचायत कर्मचारी संदिप मंगरे व अंगणवाडी सेविका कविता शेंडे यांनी सदर लसीकरण मोहीमेसाठी सहकार्य केले.