सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांची पाण्यासाठी मोठी तारांबळ होत आहे. तसेच नळाच्या पाण्यातून नारू व जंतूयुक्त पाणी येत असल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याने याची दक्षता व खबरदारी घेण्यात यावे आणि शहरात व्यवस्थित पाणी पुरवठा करावे या संदर्भात येथील नगर सेविका लक्ष्मी संतोष मद्दीवार यांनी शुक्रवार 4 मार्च रोजी असंख्य महिलां समवेत येथील उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे केले.दहा दिवसांच्या आत सुधारणा नाही झाल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी दिले.नगर सेविका लक्ष्मी मद्दीवार यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,पाणी पुरवठा संदर्भात शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.तसेच पाण्याचा योग्य दाब (फोर्स) नसल्याने शहरातील उंच भागात पाणीच मिळत नाही आणि ठराविक वेळी पाणी सोडत नसल्याने मोठी गैरसोयी होत असून पाण्यात नारू,जंतू व गढूळपणा येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले आहे.महत्वाचे म्हणजे यदाकदाचित शहरात घरगुती टिल्लू पंपाचे वापर होत असल्यास त्याचाही शोध घेऊन कार्यवाही करण्यात यावे.नळाला तोट्या नसल्यास तोट्या बसविण्यासाठी सक्ती करावे.असे म्हणत पाणी समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा नगर सेविका लक्ष्मी संतोष मद्दीवार यांनी निवेदनातून दिला आहे.निवेदन देतांना रेखा बत्तुलवार,दुर्गा मगडीवार,विमला गुम्मूलवार,चंद्रकला गुम्मूलवार,नागेश्वरी गुम्मूलवार,गंगुबाई पडगेलवार,राखी पडगेलवार,कलावती श्रीरामवार,अनिता कटलावार,अंजना गजाडीवार आदी व असंख्य महिला होते.


