सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : बैलबंडीने रेतीची वाहतूक करतांना महसूल कर्मचारी बैलबंडी जप्त करून दंडात्मक कार्यवाही करीत असून लहान नाल्याचे रेती व बद्रीसाठी लिलाव करण्यात यावे व खास बैलबंडीतुन रेती व बद्री वाहतूक करण्याची परवानगी देण्यात यावे. अशी तीव्र मागणी शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.ते येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सोमवार 7 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, किरकोळ व लहान बांधकामाच्या कामासाठी बैलबंडीने रेती बोलावितात.त्यातच पिढ्यान पिढ्या पासून असंख्य परिवार बैलबंडीने रेती, बद्री,मुरूम आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.परंतु नदीघाटचे लिलाव झाल्यामुळे ट्रॅक्टर व मोठे कंत्राटदार बैलबंडीवाल्यांना त्रास देत असल्यामुळे पर्यायाने महसूल अधिकारी आणि कर्मचारी बैलबंडी पकडण्याची मोहीम राबवित असल्यामुळे बैलबंडीने रेतीचे वाहतूक करणाऱ्यांवर ब्रेक लागत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे.त्यासाठी खास बैलबंडी करिता लहान नाल्याचे सुद्धा लिलाव प्रक्रिया राबवून रेती वाहतूक करण्याची परवानगी देण्यात यावे अशी तीव्र व एकमुखी मागणी शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी करून तशा प्रकारचे निवेदन अहेरीचे तहसीलदार यांना दिल्याचे सांगितले.तसेच रेती नदी घाटचे लिलाव झाले असले तरी महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षपणामुळे ट्रॅक्टरच्या एका परवान्यावर (टी. पी.) तीन-चार ट्रिप रेती डुलाई केली जात असल्याची शंका उपस्थित करून शिवसेनेचे रियाज भाई शेख यांनी रेतीचा काळाबाजार थांबविण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शिवसेना आंदोलन करेल.असा इशाराही दिला आहे.लहान व्यावसायिकांचे प्रश्न मिटविण्यासाठी अर्थात बैलबंडीने रेती,बद्री वाहतूक करणाऱ्या बैलबंडी वाल्यांचे समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख ना.उद्धव ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ना.एकनाथराव शिंदे व अन्य संबंधित वरिष्ठ मंत्री व अधिकाऱ्यांना मुंबई येथे प्रत्यक्षात भेटून विषय लावून धरणार असल्याचे पत्रकार परिषदेत शिवसेनेचे रियाज भाई शेख यांनी आवर्जून सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेत नगर सेवक विलास सिडाम,नगर सेविका नौरास रियाज शेख,अहेरी विधानसभा उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे,संघटक बिरजू गेडाम आदी व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


