महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : युवसेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे,युवासेना सचिव वरुनजी सरदेसाई,कार्यकारणी सदस्य शीतलताई देवरुखकर सेठ , पूर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षल भाऊ काकडे यांच्या आदेशानुसार व जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी साहेब, तृष्णाताई गुजर विस्तारक चंद्रपूर जिल्हा युवती सेना तथा हर्षलदादा शिंदे जिल्हाप्रमुख युवासेना चंद्रपूर यांच्या मार्गदशनात भद्रावती इथे सीमा नुतन लेडांगे यांच्या नेतृत्वाखाली महिला जागतिक दिवस खूप मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, मुख्याध्यापिका पिंपळकर मॅडम ,अध्यापिक कोरडे मॅडम,चौधरी मॅडम,बांदूरकर मॅडम,टपोरे मॅडम,ऍड मनीषा पथाडे, प्रेमिला लेडांगे,उपशहरप्रमुख कल्याण मंडल, नुतन लेडांगे,उपजिल्हा युवती अधिकारी शिवकुमारी गुडमल,तालुका युवती अधिकारी नेहा बन्सोड उपस्थित होते.सदर कार्यक्रमा मध्ये सर्वांचे पुष्प गुच्या देऊन स्वागत करण्यात आले व जागतिक थोर महिलांचे विचार आत्मसात करून महिलांनी काम करावे असे विचार व्यक्त करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीमा नुतन लेडांगे यांनी केले.