सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकी आलापल्ली येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम, वय 55 वर्षे यांनी 5000 रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे रा.मलमपल्ली, ता. अहेरी जि.गडचिरोली येथील असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार हे दि.7 मार्च रोजी त्यांचे भावाचे नावाने असलेल्या मोटार सायकलने मद्दीगुडम रस्त्याने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक होवून अपघात झाला होता. त्याबाबत पो.स्टे. अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्याबाबत पोलीस चौकी आलापल्लीचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम यांनी तक्रारदार यांना पोलीस चौकीमध्ये बोलावून सदर गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करणे व मोटार सायकल परत देण्याकरीता 30,000 रूपयांची मागणी केली.रक्कम न दिल्यास गुन्हयात आरोपी करण्यात येईल असे सांगितले. तक्रारदार यांना पोलीस चौकी आलापल्लीचे सहा.पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यांनी मागणी केलेली रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले.त्यामध्ये आरोपी पोलीस चौकी आलापल्लीचे सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यांनी पडताळणी दरम्यान अपघाताच्या गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करणे व मोटार सायकल परत देण्याकरीता 30,000 रूपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती 5000 रूपये लाच रक्कम आज दि.8 मार्च रोजी पोलीस चौकी आलापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे.अहेरी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर अति.कार्यभार गडचिरोली, अविनाश भामरे,सफो प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे,पो.ना राजेश पदमगिरवार,श्रीनिवास संगोजी,पोशि किशोर ठाकुर,पोहवा तुळशिराम नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली,पो.ना. रोशन चांदेकर,चा.पो. राहुल तुमरेडी, ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी केलेली आहे.