आयेशा न.पठाण/वि.संपादक पुणे
जामखेड : मागच्या जयंती वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला होता. मात्र यावेळी सरकार बदलल्याने चोंडी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास आम्हाला प्रशासनाच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु दि. ३१ मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त सर्व गावकरी, ग्रामपंचायत व आहिल्याबाई होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांच्या वतीने काढण्यात येणारी यात्रा निघेल व मी त्या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहे. ही यात्रा सकाळी ७:०० सात वाजता निघणार आहे.या यात्रेत आहिल्याबाई होळकर यांची कार्यभुमी असलेल्या उज्जेन येथून आणलेला (गजराज) हत्ती, घोडे, वारकरी, टाळकरी भावीक यांचा समावेश असलेली यात्रा ही निघणारच आहे. प्रशासनाने जरी परवानगी दिली नाही, किंवा आमच्या वर गुन्हे दाखल केले तरी यात्रा काढण्याचा निर्धार ग्रामस्थ, वंशज व आ. रोहित पवार यांनी केले आहे.व प्रशासनाने लवकर परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी आ. पवार यांनी केली आहे. चोंडी ग्रामपंचायत, आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे व आ. रोहित पवार यांच्या यांच्या माध्यमातून दि. ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी नाकारली असून या बाबत आपली भूमिका मांडण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या वतीने चोंडी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिती विविध माध्यमांच्या प्रतिनधींशी बोलताना आ. पवार यांनी आपली भूमिका मांडली. तसेच आम्ही आमचा जयंती कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री साहेब, आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यक्रमा अगोदर आटोपणार आहोत असेही आमदार रोहित पवार म्हणाले.यावेळी आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे हेही उपस्थित होते. दरम्यान पत्रकार परिषदेपुर्वी दि. ३१ मे रोजी जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाची पुर्व तयारी म्हणून येथील आहिल्याबाई होळकर सभागृहात कर्जत जामखेड तालुक्यातील येथील कार्यकर्ते व ग्रामस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी आ. रोहित पवार यांच्या समवेत आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, कैलास वराट, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्रसाद ढोकरीकर, माजी सभापती राजेंद्र गुंड, विकास राळेभात, वैजीनाथ पोले, सरपंच आसाराम गोपाळघरे, विजयसिंह गोलेकर, आरणगावचे माजी सरपंच संतोष निगुडे, शंकर गदादे, बाबासाहेब मगर, काकासाहेब कोल्हे, अंगद रूपनर, देवा खरात, विजय पावने, विजय देवकाते, श्रीमंत शेळके, तानाजी पिसे, संतोष म्हेत्रे, सुनील शेलार, भाऊसाहेब तोरडमल आदी मान्यवरांंसह कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.