सत्यपाल वाघमारे
तालुका प्रतिनिधी खेड
खेड : फेब्रुवारी / मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परिक्षेत बा मा पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीरदवडी या विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली असुन या विद्यालयाचा निकाल 86.66 टक्के लागला असून विद्यालयातून सर्वप्रथम क्रमांक लक्ष्मण कलाराम सिरवी याने मिळवला.

यास 72.67 टक्के मार्क मिळाले द्वितीय क्रमांक कु. शिल्पा रामभाऊ वाघमारे हिने मिळवला तिला 65.30 टक्के गुण मिळवले तर तृतीय क्रमांक तिची सखी बहिण कुमारी कल्पना रामभाऊ वाघमारे हिने मिळवला तिला 61.67 टक्के मार्क मिळाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

तर संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक देवयानी पवार आणि सचिव ईशान दादा पवार यांनी सर्व उतिर्ण विद्यार्थी व पालकांचे तसेच सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


