संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय श्री.नितीनजी गडकरी साहेब यांचा वाढदिवस आज कळस या ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम कळस गावचे ग्रामदैवत श्री.हरणेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करून श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्याचबरोबर त्यांच्या हातून देशाची, समाजाची, राष्ट्राची अखंडपणे सेवा घडावी यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली.श्री.हरणेश्वर मंदिरामध्ये अभिषेक झाल्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण पार पडल्यानंतर भाजपचे पदाधिकारी रमेश खारतोडे यांच्या निवासस्थानी श्री.नितीनजी गडकरी साहेब यांचा वाढदिवस कळस गावामधील ग्रामस्थ भाजपचे तालुक्यातील व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. आणि त्यानंतर नितीनजी गडकरी साहेब यांच्याबद्दल आणि त्यांच्या संघर्षमय जीवनातील घडामोडींविषयी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर रमेश खारतोडे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इंदापूर तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते शिरदाळे आण्णा, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, युवा नेते गजानन वाकसे साहेब, रमेश खारतोडे साहेब, नवनाथ खारतोडे, बाळासाहेब भांडवलकर, युवा नेते किरण काळे, रंजीत पाटील, मल्हारी जाधव, अनिल खारतोडे, विजय गावडे, धनुभाऊ खारतोडे, दादासाहेब खारतोडे, बापू पोंदकुले, अभिराज कांबळे, राव खारतोडे, चंद्रकांत कांबळे नवनाथ धवडे, ज्येष्ठ नागरिक सुरेश काकडे बुचके काका, कुलकर्णी काका, पिटके काका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.