शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : खा. श्रीकांत शिंदे आज दि.27 रोजी हदगाव येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभाला जात असताना येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसैनिकांना धावती भेट दिली .
तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वागत शहराध्यक्ष अतुल मैड यांनी केले .यावेळी शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख संतोष जाधव, गजानन शिंदे, अनिल ठाकरे, अक्षय वानखेडे ,अक्षय क्षीरसागर, भागवतराव अडकिने, चंद्रसेन आढागळे, सावंत लांडगे, ज्ञानेश्वर वानखेडे ,बळीराम राठोड, बंटी माकोडे ,इंदल राठोड, सुरज आळणे उपस्थित होते .
खासदार श्रीकांत शिंदे हदगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभाला जात असताना उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसैनिकां सोबत संवाद साधला .यावेळी शहर अध्यक्ष अतुल मैड यांनी खासदार शिंदे यांना शहरात शिवसेनेचे चालू असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त काम करा आणि शिवसैनिकांना पक्ष बळकटीसाठी करत असलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले व येणाऱ्या काही अडीअडचणी संदर्भात थेट माझ्याशी संपर्क साधावे असेही बोलताना सांगितले.


