बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी. माजलगाव
माजलगाव : दोन तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह पात्रुड शिवारातील विहिरीत आढळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली असून रोहन ताराचंद चव्हाण (वय ३०, रा. मास्तर तांडा, नित्रूड) असे तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील मास्तर तांडा (नित्रूड ता.माजलगाव ) येथील तरुण रोहन हा मागील तीन चार दिवसापासून बेपत्ता होता. त्याबाबत त्याच्या नातेवाईकाने दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच त्याचा मृतदेह पात्रुड गावालगत असलेल्या अहमद कुरेशी यांच्या शेतातील विहिरीत आज (दि.२७) दुपारी आढळून आला. ज्या विहिरीत हा मृतदेह आढळला त्या विहिरीत पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकाने वर्तवला जात आहे. दरम्यान घटनास्थळी माजलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांच्यासह पोलीस कर्मचारी नवनाथ गोरे, संजय राठोड, उबाळे यांनी भेट दिली आहे.