अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी एक अविवाहित युवती तीन महिन्याचा गर्भ असताना भरती झाली होती. सदर युवतीचे प्रकरण हे किचकट व पोलीस माहिती देणे एवढे गरजेचे होते.असे गंभीर प्रकरण असताना देखील. सदर युवतीने स्त्री रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखीतून पळ काढला.व विष प्राशन करून आपले प्राण संपविण्याचा प्रयत्न केला.यावरून जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्तव्यावर असणारे कर्मचारी सुरक्षा रक्षक,ऑन ड्युटी डॉक्टर स्त्री रोग विभागाचे प्रमुख डॉक्टर पवनिकर यांचा क्षुल्लक निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येत आहे.तरी सदर गांभीर्यपूर्वक प्रकरणावर कुठल्याही प्रकारची विशेष कार्यवाही केली. नसल्यामुळे प्रकरण भिजत ठेवले असून निष्काळजी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असून ह्या प्रकरणाशी आपण सर्वस्वी जबाबदार असून वैद्यकीय अधीक्षक ह्या पदाचा डॉ.आरती कुलवाल ह्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणीचे निवेदन दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटना, युवा स्वाभिमान पार्टी, भारिप बहुजन महासंघ,आदी पक्ष व संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ह्यावेळी दिपक निकाळजे सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष आकाश इंगळे,भारिप बहुजन महासंघाचे गौतम गवई,युवा स्वाभिमानी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे, उपाध्यक्ष सय्येद राजीक,सागर इंगळे,आनंद सोनोने,शेखर इंगळे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.