किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक वाहनांची तपासणी करून नियमांचे पालन न केलेल्या तेरा दुचाकी धारकांवर कार्यवाही करण्यात आली असून त्यांच्या कडून एकूण 2200 रुपये दंड आकारण्यात आला. पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण थांबविण्याकरिता तसेच चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्यवाहीची मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांनी दिली आहे.या कार्रवाही दरम्यान एकंदरीत 13 मोटरसायकल धारकांवर कारवाई करण्यात आली असून 2200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शनिवारी शहरात आठवडी बाजार भरत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातील नागरिक आपल्या दुचाकीवरून बाजारात येतात. कोरोनामुळे खेडे गावातुन शहरात येण्यासाठी एस टी महामंडळाच्या वाहनांची सोय शासनाने पुर्ववत न केल्याने कष्टकरी शेतकरी व सामान्य नागरिकांना नाईलाजास्तव पेट्रोल च्या किंमती गगनाला भिडल्या असतांनाही आपल्या दुचाकीवरून बाजारामध्ये माल खरेदी विक्री करण्यासाठी यावे लागते.नगरपरिषदेकडून पार्कींगची योग्य सोय नसल्याने वाहन चालकांना आपल्या दुचाकी कुठेही उभ्या कराव्या लागतात.त्यांचा या मजबुरीचा फायदा अट्टल चोर घेत असतांनाचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे.दुचाकी वाहन चोरींच्या घटना कमी करून चोरांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पातूर पोलिस स्टेशन ठाणेदार तसेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी कंबर कसल्याचे दिसून आले आहे या कार्यवाहीच्या वेळी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळीसह त्यांचे सहकारी तपासणी वेळी हजर असल्याचे दिसून आले.











