राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – येथील मुख्य चौकात राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा163 व्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले, उदघाटक म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम होते, अध्यक्षस्थानी वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे अध्यक्ष भीमरावजी आत्राम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते कैलाश कोरेत, डॉ.किशोर नैताम, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत,येरमणार ग्रामपंचायतचे माजी सरपंच बालाजी गावडे होते.
उपस्थित मान्यवरांनी 1857च्या क्रांतिकारी उठावात आपल्या दक्षिण गडचिरोली क्षेत्रातील आदिवासी भागातील वीरांनी अवघ्या 25 वर्षाच्या वयात ब्रिटिश शासनाच्या अन्याय आणि जुलमी व्यवस्थे विरोधात बंड पुकारून जंगोम दलाची स्थापना करुन लढा उभारला अश्या तेजस्वी योध्याच्या सामाजिक योगदान तसेच बलिदानाने देशातील युवकांसाठी प्रेरणादायी असून आपले हक्क, व अधिकारासाठी संविधानिक मार्गाने वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच येत्या काही दिवसातच आलापल्ली येथील मुख्य चौकात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण करण्यासाठी संकल्पना करण्यात आले,आणि गोंडवाना विद्यापीठातील अभ्यासक्रमात आदिवासी क्रांतिवीरांचे ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या समावेश करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विनोद आकनंपल्लीवार, पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी, वनहक्क समितीचे अध्यक्ष देवाजी सिडाम, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गड्डमवार, रामशाही मडावी, ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लूवार, पुष्पा अलोने, प्रिती इष्टाम, वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यनारायण आत्राम, चंद्रकांत सडमेक, राजु आत्राम, ईश्वर वेलादी, देवाजी गावडे, शंकर येरमे, वासुदेव आलाम, सुरेश उरेत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सडमेक, दिपक कंनाके, सतु कोरेत,उमेश आत्राम, बिचू उरेत, योगेश कंनाके, प्रभाकर मडावी, अविनाश आत्राम, लक्की सडमेक, तिरूपती वेलादी, अविनाश मेश्राम, मानतेश मेश्राम, गणेश मोहूर्ले, सुरज मडावी, प्रफुल आत्राम, व्यंकटेश आत्राम, मीराबाई सडमेक, वंदना मडावी, रामबाई आलाम, लिलाबाई आत्राम, दुर्गाबाई उरेत,अल्काताई कोरेत, चंद्रकला आत्राम, कल्पना उरेत, मंगला सोयाम, आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सडमेक, प्रास्ताविक कैलाश कोरेत आणि आभार सुरपाम यांनी मानले.